शेतात ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला अज्ञात व्यक्तिने लावली आग शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : तालुक्यातील मोहाडी तुकूम गावातील रहिवासी सत्यपाल गेडाम यांच्या शेतात कापणी केलेल्या धानाच्या. ढिगाऱ्याला अज्ञात आरोपींनी आग लावली. या आगीत शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्याने १६ नोव्हेंबर ला बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सत्यपाल श्रावण गेडाम यांनी एक एकरात पेरलेल्या धानाची कापणी करून शेतात ठेवली होती. १५ नोव्हेंबर ला रात्री ८.३० वाजता त्यांची साळी सुरेखा सोयाम यांनी सत्यपाल यांच्या पत्नीला त्यांच्या शेतात ठेवलेला धानाचा ढीग जळत असल्याची माहिती फोनवरून दिली.माहिती मिळताच सत्यपाल घटनास्थळी पोहोचले असता त्यांना काही लोक आग विझविण्याचा प्रयत्न करताना दिसले.या जाळपोळीच्या घटनेत पिडीतेचा हजारो रुपयाचा ऐवज जळुन खाक झाला. पिडीतेने दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबर ला सायंकाळी ७ वाजता गावातील रहिवासी नरेश गजानन गेडाम यांच्यासोबत ध्वजाच्या मुद्द्यावरुन भांडण झाले होते.त्यामुळे त्यांनी धानाच्या ढिगाला आग लावली असावी,असा संशय आहे.या आधारे बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३३६ (एफ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील. तपास बल्लारपूर पोलिस आहे.